प्राजक्ता अतुल - लेख सूची

शून्याला समजून घेताना

परंपरांचे ओझे  ससा आणि कासव ह्यांच्या शर्यतीची गोष्ट सगळ्यांनीच ऐकलेली असावी. ससा वेगाने पळतो. कासव हळूहळू चालत जाते. ससा वाटेत झोपतो. कासव त्याला ओलांडून पुढे जाते आणि शर्यत जिंकते. गोष्टीवरून घ्यायचा बोध असा की वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे. बोध अगदी खरा आहे; पण मुळात असमान क्षमता असलेल्यांना एकाच स्पर्धेत उतरवणे कितपत न्याय्य आहे? तर तसे नाही; आणि म्हणूनच कथेतल्या कासवाला जिंकवण्यासाठी सश्याला झोपवावे लागते. …

तंत्रज्ञानाची कास – प्राजक्ता अतुल

‘कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत’, ‘कोरोना टेस्टिंग किट्सची संख्या गरजेपेक्षा कमी’, ‘ढसाळ सरकारी नियोजन’, ‘राज्यसरकारने उचलली कडक पावले’पासून तर कोरोनाष्टक, कोरोनॉलॉजी, कोविडोस्कोप, कोरोनाचा कहरपर्यंत विविध मथळ्यांखाली अनेक बातम्या आपल्या रोजच्या वाचनात येत आहेत. कोरोनाविषयीच्या वैज्ञानिक माहितीपासून ते महामृत्युंजय पठनापर्यंतच्या अवैज्ञानिक सल्ल्यापर्यंतचे संदेश समाजमाध्यमांतून आपल्यापुढे अक्षरशः आदळले जात आहेत. जादुगाराच्या पोतडीतून निघणार्‍या विस्मयकारी गुपितांसारखी कधी सरकारधार्जिणी, कधी सरकारविरोधी, …

मंजूर नाही

सत्तर वर्षे उलटून गेलीतमला स्वातंत्र्य मिळालंयते गिळायचा अधिकार तुम्हांला कुणी दिला? विज्ञानावर, विवेकावरमाझे मनापासून प्रेम आहेत्याचा गेम करायचा अधिकारतुम्हांला कुणी दिला? माझा परिसर, माझी सृष्टीमाझे पाश आपुलकीचेत्याचा नाश करण्याचा अधिकारतुम्हांला कुणी दिला? दीन, दुबळे, अपंग सारेजोडण्याचा धर्म माझामाणुसकीला तोडण्याचा अधिकारतुम्हांला कुणी दिला? मला झगडावे लागत आहेमुतायच्या अधिकारासाठीजनतेला सुतायचा अधिकारतुम्हांला कुणी दिला? माझ्या मनातले विचारबोलायचा हक्क …